• Near Maratha Samaj, Ambedkar Road, Sangli-416416
  • Mon-Sat 10:00 AM-08:30 PM Sunday Closed

Testimonials

पौर्णिमा सागर रोकडे
उपळावी
माझ्या लग्नाला गेली चार वर्षे झाली पण मला बाळ होत नव्हते. तेव्हा मिस्टरांच्या मित्रांनी आम्हाला डॉ. राहुल सांगोलकर सरांबद्दल सांगितले. आम्ही सरांकडेगेलो. सरांनी चेक केले. तपासणी करून घेतले. त्यामध्येकळालेकी मला PCOD आहे. त्यांनी आम्हाला लॅप्रोस्कोपीचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही लॅप्रोस्कोपी केली. त्यानंतर त्यांच्याकडचे पढुील ट्रीटमेंट चालू ठेवली. डॉ. राहुल सांगोलकर हेखपू चांगले डॉक्टर आहेत.त्यांनी आमची ट्रीटमेंट खपू चांगल्या पद्धतीनेकेली. समजावनू सांगितले. माझे ऑपरेशन झाले तेव्हा तिथल्या स्टाफ ने देखील चांगली काळजी घेतली. त्यांच्या ट्रीटमेंट मुळेच आज मला 3 month's प्रेग्नेंसी आहे. सांगोलकर सरांकडेयेण्याआधी आम्ही खपू हॉस्पिटल फिरलो पण आम्हाला इतके समजावनू कोणीच सांगत नव्हते. पण सांगोलकर सरांनी आम्हाला खपू छान समजावनू सांगितलेआणि मगच आमची ट्रीटमेंट सरूु केली. त्यांच्यामुळे आमचे सर्व डाऊट्स क्लिअर झालेआणि त्यांच्या ट्रीटमेंट मुळे मला आज 3 month's प्रेग्नेंसी आहे. मी सांगोलकर सरांची खपू खपू आभारी आहेव त्यांच्या स्टाफची पण आभारी आहे. 
अमृता मोहन मेंगणे
रा. मिरजवाडी ता. वाळवा जि. सांगली

माझे लग्न होऊन चार वर्षे झाली तरी मला प्रेग्नेंसी राहत नव्हती. सर्व नामांकित डॉक्टर झाले,आयुर्वेदिक डॉक्टर झाले.नंतर सांगोलकर डॉक्टरांचे नाव समजले व प्रेग्नेंसी राहिली. सरांनी खूप धीर दिला व सांगितले सर्व काही ठीक होऊन जाईल. तसेच खात्री दिली. सरांनी काळजीपूर्वक प्रयत्न केले. आज मला सहा महिने पूर्ण झाले आहेत. सरांचे खूप खूप धन्यवाद.

प्राजक्ता अक्षयकुमार चोपडे
चिचाळे ता-आटपाडी जि-सांगली

माझे लग्न होऊन तीन वर्षे झाली. मला बाळ राहत तर होते पण नंतर ते खाली करायला लागायचे. काहीतरी प्रॉब्लेम असायचा. वाढ नसायची किंवा रक्तपुरवठा होत नव्हता. असे तीन वेळा झाले. नंतर त्यासाठी खपू डॉक्टर केले पण काहीच फायदा झाला नाही. मग मला डॉ. राहुल सांगोलकर सरांबद्दल कळलेआणि आम्ही सरांची ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टरांनी मला खपू छान छान सांगितले धीर दिला व उपचार चालू केले आणि आत्ता मी नऊ महिन्यांची गरोदर आहे. खरंच सरांचेखपू खपू धन्यवाद.

मिना महादेव बाड
कर्नाक रोड, सांगली

मला लग्नानंतर बारा वर्षे बाळ होत नव्हते. सांगोलकर डॉक्टरांना दाखवल्यानंतर एक वर्षाच्या अगोदर आम्हाला फरक पडला. बाळ झाले. सांगोलकर डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ खपू चांगला आहे. सर सर्व गोष्टी व्यवस्थित समजावनू सांगतात. मी आणि माझे कुटुंब डॉ. सांगोलकर आणि त्यांच्या स्टाफचे खूप  आभारी आहोत.

मेघना महादेव वाळवेकर
आमणापूर

माझे नाव सौ. मेघना महादेव वाळवेकर. आमच्या लग्नाला दोन वर्षे झालेली, मला बाळ राहत तर होते परंतु काही ना काही कारणामुळे खाली व्हायचे. आम्ही त्यासाठी खपू डॉक्टर केले पण त्यांचा काहीच फायदा होत नव्हता. मग आम्हाला आमच्या एका  नातेवाईकांकडून सांगोलकर सरांच्या बद्दल कळले आणि आम्ही सरांची ट्रीटमेंट सरूु केली. सरांनी आम्हाला खपू छान मार्गदर्शन केले. वेळोवेळी उत्तम सल्ला दिला. सरांचा सर्व स्टाफ देखील खपचू उत्तम आहे. डॉक्टरांनी आम्हाला धीर दिला व उपचार चालू केले आणि मी आता एका सदृुढ मुलाची  आई आहे. त्याबद्दल आम्ही सरांचे खपू खपू आभारी आहोत. Thank you Sangolkar Sir & Madam, Because of your professionalism & great smiles, we felt like we were in good hands and that gave us peace of mind.😊

सौ शारदा रमेश कौरव
हडपसर (पुणे) माहेर - सांगली
माझे नाव शारदा रमेश कौरव, मी हडपसर पुणे येथे राहते. माझे माहेर सांगली येथे आहे. गेल्या दोन वर्षापासून पोटात दुखत असल्याने माहेरी आल्यानंतर आईच्या सांगण्यावरून आपल्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करून दाखवले. त्याप्रमाणे ऑपरेशन साठी हजर राहिले. येथील व्यवस्था चांगली होती, सर्व नर्स यांचे लक्ष चांगले होते. डॉक्टरांचे मार्गदर्शन चांगले मिळाले. एक चांगला अनुभव आम्हाला मिळाला. सर्व स्टाफ चांगला असून योग्य ती काळजी घेतली जाते. मी आणि माझे कुटुंब आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहोत.
सौ. सुप्रिया किसम कुंभार
डोंबिवली
मी सौ.सुप्रिया किसन कुंभार, राहणार-डोंबिवली माझ्या गर्भाशयाच्या पिशवीचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी मी या ठिकाणी माझ्या भावाच्या ओळखीने आले. मला खूपच छान ट्रीटमेंट मिळाली. खूप छान पद्धतीने मला माझा प्रॉब्लेम सरांनी सांगितला, ऑपरेशन केले. सरांचा स्वभाव, बोलणे खूप छान आहे. स्टाफ ही खूप चांगला आहे. मी सरांची व स्टाफ ची खूप आभारी आहे. धन्यवाद.
आशाबाई डोंबाळे
घोरपडी

सरांना माझा नमस्कार! मला पहिली पायरी चढताना हॉस्पिटल खूप आवडले. मला, माझ्या मनाला खूप भीती वाटत होती. पण सरांनी ती भीती दूर केली. मला खूप आनंद झाला. सरांचा सर्वच स्टाफ खूप छान आहे. जास्त काळजी घेतात. सरांचा स्वभाव एकदम खूप छान वाटला. सरांनी मला न विचारता स्वतः स्पेशल रूम दिली. सरांनी व सरांच्या स्टाफने माझी खूप काळजी घेतली. सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. वेळोवेळी उत्तम सल्ला दिला. मी व माझे संपूर्ण कुटुंब आपले खूप खूप आभारी आहोत.

सपना नरळे
पिंपळवाडी

हॅलो सर

सरांना माझा नमस्कार सर तुमच्या हॉस्पीटलची पायरी चढताना मनात खूप भीतीं

वाटली कारण ही पायरी अशी आहे तर आतून हॉस्पीटल कसे असेल, पण आत आल्यानंतर कढले की सर कसे आहेत. आणि येथील स्टाफ कसा आहे.

सरांचा स्वभाव खूपच मायालू आहे. आणि त्यांनी मनातली भीतीही खूप मायेने घालवली पण ऑपरेशन बद्दल ही मनात शंका होत्या त्या त्यांनी दूर केल्या अगदी मनातली भीती त्यांनी घालवली

सर तुमच्या हॉस्पीटलचे नावही खूप आवडले इथे स्त्रिला खूप आदर केला जातो. सर मी तुमची आणि तुमच्या स्टाफची खूप खूप आभारी आहे.

लता मुठेकर
जत, माडग्याळ

माझे नाव लता मठुेकर. माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली परंतुबाळ राहत नव्हते. बरेच दवाखाने दाखवले पण काय पॉझिटिव्ह रिपोर्ट आले नाहीत. पण मी जेव्हा सरांच्या कडे आले तेव्हा  सरांनी खपू चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट दिली आणि आता मला सातवा महिना सरूु आहे. सर आणि हॉस्पिटल स्टाफ यांचे पेशंटशी असणारे जिव्हाळ्याचे नाते मी इतक्या कमी शब्दात नाही सांगू शकत. सर तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा फीडबॅक इतक्या कमी शब्दात देणे कदापि मला शक्य नाही. तुमचे कार्य आणि प्रेरणा अनमोल आहे.Thank you so much...

कोमल श्रीकृष्ण करांडे
सांगली

माझे नाव कोमल श्रीकृष्ण करांजे. गेली चार ते पाच वर्षे मला पोटदुखीचा त्रास होता. बरेच डॉक्टरांना दाखवले, सोनोग्राफी केली त्यांच्या उपचारामुळे काही दिवस बर वाटायचे आणि पुन्हा त्रास सुरू व्हायचा. माझा सगळ्या डॉक्टरांवरूनच विश्वास उठला होता. मग एके दिवशी माझ्या पोटात जास्त दुखायला लागले तेव्हा आम्ही आमच्या पाहुण्यातील सांगोलकर डॉक्टरांना आमची अडचण सांगितली. त्यांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. पूर्ण पोटाची सोनोग्राफी केल्यावर त्यातून असे कळले की माझ्या पोटात गाठ झाली आहे. ती 48 एम एम ची होती. ऑपरेशन करून ती गाठ काढावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही पण तयार झालो. ऑपरेशन झाले, माझी अगदी व्यवस्थित काळजी घेतली. डॉक्टरांचा पूर्ण स्टाफ मस्त आहे. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. मी आणि माझे कुटुंब डॉक्टर सांगोलकर आणि त्यांच्या स्टाफचे खूप खूप आभारी आहोत.

सुनिता आवळे
सांगली

अतिशय सुंदर अशी हॉस्पिटल मधील ट्रीटमेंट आहे. डॉक्टर अतिशय चांगले असून चांगला संवाद पेशंटशी करतात. हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ खूप चांगला आहे. योग्य परफेक्ट निदान, योग्य उपचार पद्धत आहे. त्यामुळे मानसिक आधार मिळतो. सांगोलकर हॉस्पिटल खूप चांगले आहे.

मीरा जमदाडे
सांगली

मला गर्भाशयाचा त्रास होता. जेव्हा मी सरांना पहिल्यांदा भेटले तेव्हाच मला आधार वाटला. आता मी पूर्ण शंभर टक्के बरी होणार असा विश्वास वाटला. सरांचा स्वभाव, बोलणे, पेशंटकडे बघून हसणे यातच खूप खूप समाधान वाटते. हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ व सर्व पेशंटची घेतली जाणारी काळजी बघून मन भरून येते. मी हॉस्पिटलमध्ये आहे असे वाटले ही नाही. ते सर्व मला माझ्या घरातील माणसे आहेत असे वाटत होते. सर मला माझ्या छोट्या भावासारखे वाटत होते. तुम्ही सर्वांनी मला पुन्हा आनंदाने आयुष्य जगण्याचे बळ दिले. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

निर्मला तानाजी कदम
मु.पो. पळशी

Doctors is co-operative and provide-good treatment, staff also good. Hospital is clean & Good. Thank You.

अश्विनी दादासो कराडे
कोळे

सर तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा फीडबॅक इतक्या कमी शब्दात देणे कदापि मला शक्य नाही. तुमचे कार्य आणि प्रेरणा अनमोल आहे

ज्योती विकास ठोंबरे
विश्रामबाग, सांगली

माझी डिलिव्हरी 2019 मध्ये झाली. सरांकडे ट्रीटमेंट नंतर आम्हाला एक गोंडस मुलगी झाली. सरांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे आणि इथला स्टाफ पण खूप चांगला आहे. मला या हॉस्पिटलचा अनुभव खूप चांगला आला आहे. सरांकडून प्रत्येक समस्येचे निराकरण सखोल पद्धतीने होते आणि समाधानकारक उत्तरे देखील मिळतात. त्यामुळे इथे येणारे प्रत्येक पेशंट आपल्या समस्यावर उत्तरे घेऊन जातात. मला मिळालेल्या ट्रीटमेंटने मी खूप समाधानी आहे.Thank You Sir.